हिरवांकुर फाउंडेशनचे जिल्हा न्यायालयात हरीत ध्वजारोहण.*

*हिरवांकुर फाउंडेशनचे जिल्हा न्यायालयात हरीत ध्वजारोहण.*
दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता (CBS शेजारील) जिल्हा न्यायालय आवारात पारंपारिक पद्धतीने सन्माननीय जिल्हा सरन्यायाधीश श्री जगमलानी साहेब व ईतर न्यायाधीश साहेबां सोबत, न्यायालयातील कर्मचारी, सर्व सन्मा. वकील वर्ग तसेच पोलिस अधिकारी यांची एक तुकडी सह इतर सामान्य सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवांकुर फाउंडेशन नाशिक व बार असोसिएशन नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोख्याप्रकारे भारत मातेला हरित मानवंदना देऊन भारतातील सर्वोच्च सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी टीम हिरवांकुर तर्फे न्यायालयाच्या मुख्य दगडी कमानी खाली सुंदर अशा रांगोळी द्वारा भारत मातेची प्रस्तुती करण्यात आली. या संकल्पने नुसार सर्व दिशांनी भारतीय प्रजातीच्या लुप्त होत असलेल्या दुर्मिळ वन औषधी वृक्षांची हिरवांकुरीत सुसज्ज रोपांच्या सुमारे २०० लहान कुंड्यां मांडण्यात आल्या. या द्वारा भारत मातेच्या सर्व दिशा हरित होवो हा अनमोल संदेश देण्यात आला. झेंडावंदनानंतर माननीय सर न्यायाधीश श्री जगमलानी साहेब, इतर न्यायाधीश साो. , सन्मा. वकील व इतर उपस्थित मान्यवर कमानी खाली पोहोचले. याप्रसंगी हिरवांकुर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री निलयबाबु शाह यांनी उपस्थितां समक्ष संकल्पना प्रस्तुत केली. टिम हिरवांकुरतर्फे प्रत्येक इच्छुक वकीलांना एक रोप सांभाळण्यासाठी देण्यात येईल. त्याबद्दल वर्षभर संपूर्ण माहिती व मार्गदर्शन टिम हिरवांकुर द्वारा केले जाईल. वर्षभर सांभाळ करून छान तयार झालेले बाळरोप येत्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोर्ट कॅम्पस मध्येच वृक्षारोपण करण्यात येईल. विशेष गोष्ट म्हणजे त्या प्रत्येक वृक्षांना टिम तर्फे एक बारकोड निर्माण करून दिला जाईल. याद्वारे त्या लुप्त होत असलेल्या भारतीय प्रजातींच्या वृक्षाची माहिती व त्याचा सांभाळ करणाऱ्या प्रत्येक देश प्रेमी वकिल अथवा व्यक्तीचे नाव त्या वृक्षावर तो वृक्ष जिवंत असेपर्यंत म्हणजेच सुमारे पाचशे ते हजार वर्ष राहील. श्री निलयबाबु शाह पुढे म्हणाले की भारतीय पारिवारिक व्यवस्थेनुसार जिल्हा व त्यातील तालुके यांचे मिळून एक कुटुंब तयार होते हे कुटुंब सूचारू रूपाने चालवण्याचे मोठे कार्य कुटुंब प्रमुखाचे असते व जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख हे सरन्यायाधीश साहेब असल्याने त्यांनी सर्वांना या हरित संकल्पनेत सामील होण्याचा आदेश करावा. त्यावर माननीय सरन्यायाधीश साहेब व इतरांनी टाळ्यांच्या गजरात या संकल्पनेचे स्वागत केले. जिल्हा सरन्यायाधीश श्री जगमलानी साहेबांनी
टिम हिरवांकुर द्वारा प्रस्तुत केलेली जनजागृतीची ही अनोखी संकल्पना अत्यंत वेगळी अनमोल व देशहिताशी असल्याचे मत आनंदाने व्यक्त केले. तसेच एडवोकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष एडव्होकेट श्री नितीन ठाकरे, माजी अध्यक्ष एडव्होकेट श्री दिलीप वनारसे यांनी सुद्धा उपस्थित सर्वांना या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर टीम हिरवांकुर तर्फे सौ राखी शाह यांनी अमृत काल पंचक्रोशीची शपथ उपस्थित सर्वांना दिली. या नंतर टीम हिरवांकुरने प्रथम भारतीय परंपरेनुसार तुळशी चे रोप सरन्यायाधीश साहेबांना देऊन या हरित सोहळ्याचा शुभारंभ केला. अगदी पाचच मिनिटात सुमारे २०० दुर्मिळ रोप वकील मंडळींनी आनंदाने स्वीकारली व या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इतरांनी मोठ्या संख्येत टिम हिरवांकुर कडे नावे नोंदवली. लवकरच सर्वांना रोप पोहोचवण्यात येतील असे टिम हिरवांकुरतर्फे जाहीर करण्यात आले.
या अनोख्या संकल्पनेस साकारण्यात विशेष सहकार्य लाभलेल्या गोवा बार असोसिएशनचे सेक्रेटरी व नाशिकचे प्रख्यात सीनियर एडवोकेट श्री अविनाश भिडे सरांचे टिम हिरवांकुरने आभार मानले.
याप्रसंगी हिरवांकुर फाउंडेशन तर्फे
सौ.नलिनी शाह
सौ. अश्विनी भट
सौ.राखी शाह
सौ.पार्वती पटेल.
श्री. दिलीप खैरनार.
श्री. प्रितेश महाजन
श्री सुनील भट
आर्कि. किंजल शाह.
श्री. प्रविण पटेल.
श्री. योगेश वारे.
सौ.प्रमिला. पाटील
कु.वेलिना शाह.
सौ. वृषाली बच्छाव
कु.सिध्दी कुलकर्णी
कु.वृषाली कुलकर्णी
कु.सोनाली कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता करतांना प्रत्येक उपस्थितांनी
*मी हिरवांकुर*
*मी पर्यावरण योद्धा*
या स्लोगनच्या घोषणांनी केली.
- समाजातील सेलिब्रिटींचे अनुकरण इतर सगळे आनंदाने करतील असे मत उपस्थित त्यांनी व्यक्त केले.