राजकिय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन*

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन*
*नाशिक जनमत , दि. १४ : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल नाशिक जिल्ह्याच्याा आभार दौऱ्यावर आले होते या वेळेस त्यांनीी रात्री श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मंदिराचे महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज, विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, आदी उपस्थित होते.
महंत सुधीर दास महाराज यांनी मंदिराची माहिती देत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले. मागील वर्षी नरेंद्र मोदी यांनी देखील का राम मंदिरात भेट घेऊन दर्शन घेतले होते..