
*बांगलादेशी वस्तूची युवा मोर्चा कडून होळी*
हिंदू वर अत्याचार थांबत नाहीत तो पर्यंत बांगलादेशी वस्तू वर बंदी घालण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी
नाशिक जन्मत : बांगलादेशी वस्तूची भाजप कडून होळी करण्यात आली. हिंदू वर अत्याचार थांबत नाहीत तर पर्यंत बांगलादेशी वस्तू वर बंदी घालण्याची भारतीय जनता युवा मोर्चा कडून मागणी आहे.
नाशिक मधील डिकाथलॉन या नामांकित मॉल मध्ये बांगलादेश निर्मित वस्तू विकल्या जाऊ नयेत यासाठी
भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर व नाशिक ग्रामीण जिल्हा यांच्यावतीने निवेदन देऊन निषेध आंदोलन करण्यात आले. डिकाथलॉन येथे बांगलादेश निर्मित वस्तूंची विक्री करण्यात येत असल्याचे समजताच त्या संदर्भात तेथील प्रशासनाला भेटून सदर घटनेचा जाब भाजप युवा मोर्चाच्या वातीने विचारण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश मध्ये हिंदू मंदिर वर हल्ले, हिंदू समजावे अत्याचार त्यासोबतच हिंदू साधू संत वर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. अश्या वेळी आपण त्या देशातील वस्तू विक्री करू नये अशी मागणी भाजप युवा मोर्चाची आहे. शहरातील सर्वच व्यापारी वर्गाला त्यावेळी इशारा देण्यात आला की यापुढे जर आपण बांगलादेशी वस्तूंची विक्री सुरूच ठेवली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छेडण्यात येईल यावेळी डिकॅथलोन परिसरात बांगलादेशी वस्तूंची होळी करण्यात आली यावेळी प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले की लवकरात लवकर ते संपूर्ण बांगलादेशी वस्तू सदर ठिकाणाहून हद्दपार करतील व यापुढे परत बांगलादेशी विक्री होणार नाही.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे नाशिक महानगर अध्यक्ष सागर शेलार व नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनील पवार,
सरचिटणीस डॉ. वैभव महाले, प्रशांत वाघ, विनोद येवले, मंडल अध्यक्ष ॲड. ऋषिकेश शिरसाठ, अरुण दातीर, अक्षय गांगुर्डे, मंडल सरचिटणीस संकेत खोडे, शहर उपाध्यक्ष समाधान दातीर, अनिल थोरात, अमर राजे, आदित्य सोनवणे, गिरीश बोडके, चेतन शिंदे, अमोल गायकवाड, महेश गिते आदी उपस्थित होते.