देश-विदेश

ओझर एच.ए.एल. कंपनीस 6 हजार 828 कोटींचा निधी मंजूर;* *70 एचटीटी 40 ट्रेनर विमानांची निर्मिती होणार*

दिनांक: 29 मार्च 2023

*ओझर एच.ए.एल. कंपनीस 6 हजार 828 कोटींचा निधी मंजूर;*
*70 एचटीटी 40 ट्रेनर विमानांची निर्मिती होणार*

*: डॉ. भारती पवार*

*नाशिक, दिनांक 29 मार्च, 2023 (जिमाका वृत्तसेवा) :*
ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमीटेड (एच.ए.एल.) कंपनीला विमानांच्या निर्मितीसाठी 6 हजार 828 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्याबरोबरच एच.ए.एल. कंपनीत एचटीटी 40 मॉडेलच्या विशेष ट्रेनर विमानांची निर्मिती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नाशिक येथील ओझर येथे स्थित एच.ए.एल. ला 70 एचटीटी च्या 40 एअरक्रॉफ्टची निर्मिती करण्यासाठी 6 हजार 828 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी एच.ए.एल.ओझर येथील अखंड कनेक्टिव्हीटी व तेथील उपलब्ध मनुष्य बळाची संख्या लक्षात घेता व विविध प्रकारची यशस्वी विमाने तयार करण्याचा एचएएल प्रशासनाचा अनुभवाच्या जोरावर हे काम एचएएल कंपनीला मिळावे यासाठी संरक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत व एच.ए.एल. प्रशासनाकडे गेल्या काही वर्षांपासून कामाचा कमी झालेला ओघ विचारात घेता केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी एच.ए.एल. ला 60 विमानांची निर्मिती करण्यासाठी उत्पादनास मंजूरी दिल्याची माहिती लेखी पत्राद्वारे दिली आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

न्यू इंडिया 2022 रणनिती अंतर्गत भारताने सर्व क्षेत्राचा समतोल विकास करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यात संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एच.ए.एल. ही प्रतिष्ठीत भारतीय सरकारी मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी असल्याचा नाशिकला अभिमान आहे. 1964 पासून एच.ए.एल. देशाच्या संरक्षण उत्पादनात सक्रीय सहभाग घेत आहे. केंद्र सरकारच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या दृष्टीने देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी नाशिक एच.ए.एल. कंपनीस या विमान उत्पादनाचे कंत्राट दिल्यास नाशिक विभागासाठी सन्मानाची बाब ठरेल, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.

एच.ए.एल. नाशिक कंपनीत यापूर्वी अनेक लढाऊ विमाने व इतर प्रकारच्या विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकची एच.ए.एल. विमान बनविणारी कंपनी नेहमीच नव्या प्रयोगशील विमानांच्या निर्मितीसाठी सज्ज असते. वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी 40 जातीचे ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एच.ए.एल. देण्याचा निर्णय संरक्षण विमानाने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाने एच.ए.एल. कंपनीतील सुमारे 3 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळणार आहे. एच.ए.एल. नाशिक विभागात उपलब्ध असलेले कौशल्य आणि पायाभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये विविधीकरणाच्या दिशेने पावले उचलली जाणार आहे. तसेच या निर्णयामुळे स्थानिक व्यासायिकांसह इतर उद्योगांना चालना मिळणार असून रोजगार निर्मिती वाढणार आहे, यासाठी केंद्रीय राज्य्मंत्री डॉ. भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विशेष आभार मानले आहेत.

*इन्फो : 70 एचटीटी 40 विमान*
_“एच.ए.एल. ओझर येथे 60 विमानाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी 6 हजार 828 कोटींच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. वायु दलात नव्याने दाखल झालेल्या वैमानिकांना एचटीटी 40 जातीच्या ट्रेनर विमानाद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विमानाचा ताशी स्पीड 400 कि.मी. असणार असून विमान एकाच वेळेस तीन तास हवेत राहू शकणार आहे. आत्मनिर्भर भारताचे उद्दीष्टानुसार सदरचे विमान हे पूर्णत: भारतीय बनावटीचे असणार आहे.” … केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार_

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे