हॉटेल मधून दारूच्या बाटल्या चोरणाऱ्या सराईतास अटक.
मद्य चोरी करणाऱ्या सराईतास बेड्या; तीन गुन्हे उघडकीस
नाशिक नाशिक शहरामध्ये चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कुठे सोनसाखळी कुठे घरपोडी तर पुढे हाणामारी काही ठिकाणी कुणचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहे . शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने
सराईत गुन्हेगार हसन कुट्टी (४६, रा. नवनाथनगर, पेठरोड) याला अटक करून त्याच्याकडून मद्यचोरीसह तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार, पेठरोड परिसरात संशयितरीत्या फिरत असलेल्या हसन कुट्टीला गुंडाविरोधी पथकाने दत्तनगर येथे सापळा रचून बेड्या घातल्या. त्याने म्हसरूळ व मुंबईनाका पोलिसांत दाखल तिन्ही चोऱ्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याचा ताबा म्हसरूळ पोलिसांकडे देण्यात आला आहे.
(,१० फेब्रुवारी रोजी त्याने न्यू उत्तम हिरा हॉटेलमधून ६९ हजार १२० रुपयांची विदेशी दारू व रोख रक्कम चोरी केल्याचे त्याने मान्य केले, तसेच नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याच हॉटेलमध्ये २ लाखांची चोरी आणि एप्रिल २०२५ मध्ये मुंबईनाका येथील हॉटेल रसोईमध्येही ४६ हजारांची चोरी केल्याची कबुली दिली. कुट्टीवर शहर व ग्रामीण भागात एकूण १७ गुन्हे दाखल)