ब्रेकिंग
नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळ पर्यटनासाठी बंद जिल्हा अधिकारी सुरज मांढरे यांचे आदेश.
नाशिक जनमत नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद करण्यात आलेली आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये व नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात करुणा चे रुग्ण मिळत आहे शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात ब्रह्मगिरी पर्वत त्रंबकेश्वर येथील गंगाद्वार तसेच रामशेज मांगीतुंगी हरिहर किल्ला इत्यादी ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते दरम्यान आता कोणीही पर्यटकाने नियमाचे उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश काढण्यात आले आहे. वाढत्या करुणा च्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी मास्क चा वापर करावा व गर्दीच्या ठिकाणी टाळावीत शंभर दोनशे वर निघणारी रुग्णसंख्या आता जिल्ह्यामध्ये दोन ते अडीच हजार निघू लागले आहे त्यामध्ये अजूनही निर्बंध यामध्ये वाढ होऊ शकेल असे यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले
