गंगापूर पोलिसांनी पकडले दोन सोन साखळी चोर. अनेक गुन्हे उघडिस येण्याची शक्यता

गंगापूर पोलिसांचा 3 ठिकाणी ४८ तास ट्रॅप, रात्री दीडला पकडले २ चेन स्नॅचर
प्रतिनिधी । नाशिक जन्मत नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्या अंगावरील सोनसाखळी ओढून चोरण्याचे प्रमाण वाढले आहे या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क झाले आहे. काल गंगापूर रोड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
सोनसाखळी चोरी व लुटीसाठी त्यांनी चोरीच्या मोटरसायकल वापरल्या. याबाबत अधिक माहिती अशी की
पोलिसांनी गंगापूर सातपूर -त्र्यंबकरोड, शिवाजी नगर व – एबीबी सर्कल या ३ ठिकाणी ४८ – तास ट्रॅप लावत सोनसाखळ्या 5 खेचणारी टोळी जेरबंद केली. या – टोळीत २ अल्पवयीनांसह २ सराईत त गुन्हेगारांचा समावेश असून लुटीचे ८. सोने घेणाऱ्या सराफालाही अटक व केली आहे. टोळीकडून शहरातील ७ आणि पिंपरी चिंचवडमधील २ असे ९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे * उघडकीस आले आहेत.
– सोनसाखळी चोरीच्या घटना सुरु असतांना गंगापूर पोलिसांनी
संशयित सोनसाखळ्या लुटण्यासाठी दुचाकी चोरी करत होते. पाठोपाठ दोन-तीन सोनसाखळ्या खेचल्यानंतर दुचाकी बदली करत चोरी केलेली दुचाकी जेथून चोरी केली त्या ठिकाणी नेऊन ठेवत होते. संशयितानी सोनसाखळी लुटीतील रक्कम मैत्रिणींवर उडवल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयित महागडे मोबाइल व कपडे वापरत असे.
सोनसाखळ्या खेचणारी टोळीच जेरबंद केल्याने शहरातील सोनसाखळी लुटीच्या घटनांना दोन दिवसांपासून ब्रेक लागला आहे.
पथकाने ३ ठिकाणी सापळा लावत अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल (रा. गोवर्धन) आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. चौकशीत कासीम उर्फ बव्वासोबत सोनसाखळ्या चोरी करत त्रिमूर्ती चौकातील सराफ विलास प्रमोद विसपुते याला विक्री केल्याची कबुली दिली. पथकाने संशयित सराफाला ताब्यात घेतले. वरीष्ठ निरीक्षक जुगवेंद्रसिंग राजपूत यांच्या पथकातील राकेश राऊत व तुळशीदास चौधरी यांना माहिती मिळाली होती. संशयित रात्रीच्या वेळीच सोनसाखळी चोरी करतात या माहितीच्या आधारे पोलिसांनी या संशयत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडी येण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.