उत्तराखंडामध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा भाविकांचा मृत्यू.

उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ६ भाविकांचा मृत्यू
डेहराडून नाशिक जनमत :- उत्तराखंडची चारीधाम यात्रा चालू झाली असून भाविकांची मोठी गर्दी आहे. दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था आहे. सध्या या ठिकाणी वातावरण खराब आहे. काही ठिकाणी मेगर्जनाचा पाऊस व गारपीट देखील झाले आहे.आज उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये ७जण होते. ६ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टर मध्ये एकूण सात व्यक्ती होत्या. त्यातील एक व्यक्ती झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहे. सर्व यात्री मध्यप्रदेश मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तरकाशीतील गंगनी येथील भागीरथी नदीजवळ हा अपघात झाला. हेलिकॉप्टर गंगोत्री धामला जात होते. प्रशासनाने सांगितले की, हेलिकॉप्टरमध्ये ४ पुरुष आणि २ महिला होत्या, कॅप्टन रॉबिन सिंग हे त्याचे पायलट होते.
पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर डेहराडूनमधील सहस्त्रधारा हेलिपॅडवरून उड्डाण केले. त्यांना खरसाली येथे उतरावे लागले. प्रवाशांना खरसालीहून
गंगोत्री धामला जावे लागते. हेलिकॉप्टरमधील प्रवासी मुंबई आणि आंध्र प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी चार मुंबईचे आणि दोन आंध्र प्रदेशचे होते. हे हेलिकॉप्टर एअरोट्रान्स सर्व्हिस या खाजगी कंपनीचे होते,
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये हवामान खराब आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. चारधाम
यात्रा मार्गावर काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीटही झाली आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील नागरिकांनी
आणि भाविकांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आल