हेलमेट घाला नाही तर उद्यापासून होणार कारवाई
नाशिक जनमत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांनी हेल्मेट घालने वाहनधारकांना सक्तीचे केलेले आहे नाहीतर पाचशे रुपये दंड हा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक शहरात वाहनाची संख्या वाढलेली आहे बरोबरच अपघाताची देखील सखेत लक्षणीय वाढ झालेली आहे त्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करावे असे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेले आहे हेल्मेट वाहन धारकांना सक्ती करत हेल्मेट नसेल तर पेट्रोल नाही ही मोहीम राबविण्यात आली तसेच त्यानंतर हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांचे ट्राफिक चिल्ड्रन पार्क येथे सपदूषण देखील करण्यात आले त्यानंतर हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना शासकीय तसेच खासगी कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला यानंतर अनेक वाहनधारकांकडून हेल्मेट परिधान केले जाऊ लागले मात्र यानंतरही हेल्मेट नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे नसल्यास त्याला पाचशे रुपये दंड तर दुसऱ्यांदा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे शहरामध्ये विविध ठिकाणी अचानक पणे तपासणी मोहीम ही कारवाई करण्यात येणार आहे कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमाचे पालन करावे परिधान करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे