ब्रेकिंग

नाशिक मध्ये पुन्हा एकदा खून. कंपनीच्या मॅनेजरची केली कार अडून धारदार शास्त्रने हत्या.

नाशिक जनमत गेल्या चारच दिवसांपूर्वी सातपूर परिसरात झालेल्या गोळीबार नंतर काल रात्री खुनाची णाची घटना घडलेली आहे. नाशिक शहर नागरिकांना आता सुरक्षित शहर म्हणून वाटत नसल्याचे चित्र समोर आले आहे. कुठे स्त्रियांचे दागिने ओरबाडणे. तर कधी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक. तर पुढे शाळा कॉलेजपुढे हनामारी. तर कधी गाड्या फोडणे तर कधी कोयता गेगची दहशत. काल रात्रीच्या घटनेने पुन्हा एकदा नाशिक शहराचा सिडको परिसर हद रला आहे नाशिकमध्ये धारदार शस्त्राने हल्ला करुन कंपनी मॅनेजरची हत्या…नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडली असून पाथर्डी फाटा नजीक असलेल्या पांडवलेणी परिसरात हा प्रकार घडला आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी कंपनी व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने वार करत रस्त्यावर फेकून दिले.
त्यानंतर नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मात्र या घटनेने नाशिक शहर हादरले आहे.मुंबई नाशिक महामार्गावरील पाथर्डी फाटाजवळ कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाथर्डी फाटा नजीक असलेल्या पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगणजवळ नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.रोहिणी इंडस्ट्रीजचे मॅनेजर असलेल्या योगेश मोगरे यांची चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले.या हल्ल्यात योगेश मोगरे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी या रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षा चालकाने मोगरे यांना रिक्षात बसवून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इंदिरानगर पोलीस  तपास चालू असून लवकरच आरोपी सापडतील असे सांगण्यात आले आहे. घटनास्थळावर एका रिक्षा चालकाने जखमी मोगऱ्यांना जीव वाचवण्यासाठी दवाखान्यात नेले. परंतु अखेर आज सकाली मृत्यूची झुझ देत असताना त्यांची निधन झाले. नाशिक शहरात पोलिसांचा वाचक कमी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलिसांची गस्त वाढण्याची गरज आहे. दरम्यान ग्रस्त घालणारे पोलीस हेच सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. गर्दीच्या ठिकाणाहून पोलीस निघून जात असल्याचे चित्र आहे सिंघम पोलीस अधिकाऱ्याची गरज आज सिडकोस संपूर्ण नाशिक शहराला आहे असे नागरिक बोलत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे