भाऊ बदकी चा जुना वाद.कारखाली चिरडून तरुणाची हत्या, पाच जखमी भावकीच्या वादातून दोन गटांत हाणामारी

दातलीत कारखाली चिरडून तरुणाची हत्या, पाच जखमी
भावकीच्या वादातून दोन गटांत हाणामारी
सिन्नर : प्रतिनिधीनाशिक जन्मत भावबंदकीचा वाद आणि जुन्या भांडणाची कुरापत यातून तालुक्यातील दातली येथे दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सागर मारुती भाबड (३५) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयत सागरच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्यात आल्याची चर्चा सिन्नर ग्रामीण रुग्णालयात परिसरात सुरू होती.
सागर यांची पत्नी, भाऊ, भावजयी तिघेही पोलीस दलात कार्यरत – आहेत. या घटनेत जगन्नाथ नरहरी भाबड (५०), अक्षय म्हाळू भाबड (२८), म्हाळू नरहरी भाबड (५३), सुयोग म्हाळू भाबड (२२) सर्व रा. – दातली, ता. सिन्नर आणि ओमकार विजय डोमाडे (२१) रा. देशवंडी, ता. सिन्नर असे पाच जण जखमी झाले आहेत. सागरसह या पाचही जणांना उपचारासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले – होते. सागर याला
डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर उर्वरित पाच जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पूढील साठी नाशिक येथील शासकीय रुग्णालय येथे पाठवले आहे
उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सागर याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्याचे नातलग आणि मित्रपरिवाराने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. अनुचित घटना घडू नये म्हणून सिन्नर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संभाजी गायकवाड, मुसळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा ग्रामीण रुग्णालयात बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता त्यामुळे रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, दोन गटात झालेल्या या हाणामारीत दुसऱ्या गटाचे जखमी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुसळगाव पोलीसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
दोन दिवसांच्या अंतराने बापलेकाचा मृत्यू
सागरचे वडील मारुती भाबड यांना मेंढी येथील व्यसनमुक्ती केंद्रात दारू सोडण्यासाठी ठेवले होते. बुधवारी त्यांनी या केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूला दोन दिवस उलटत नाही तोच भाऊबंधांच्या मारहाणीत सागरचा मृत्यू झाल्याने भाबड कुटुंबावर दोन दिवसात दोन आघात झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिक्षा न झाल्यास पोलीस स्टेशनसमोर आत्महत्या
या घटनेत गंभीर जखमी झालेले सागर चे चुलत भाऊ आणि चुलते यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत असताना त्यांनी टाहो फोडला. सागरच्या मारेकऱ्यांना अटक होऊन शिक्षा झाली नाही तर पोलीस स्टेशनच्या समोर आत्महत्या करण्याचा इशारा चुलत भाऊ आणि चुलत्यांनी दिला.