अचानक समोर वाहन उभे करून महिलेची सोनसाखळी चोरली.

प्रतिनिधी | नाशिक जन्मत
नाशिक नासिक पोलिसातर्फे गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आठवण प्रयत्न केले जात आहे रात्रीची नातेबंदी गस्त वाढवली आहे पण तरी देखील चोरीच्या घटना सोनसाखळी यासारखे प्रकार गुन्हेगार गरजच आहे. काल
पायी जाणाऱ्या महिलेच्या समोर अचानक वाहन उभे करत महिला घाबरल्याची संधी साधून गळ्यातील ७५ हजारांचे मंगळसूत्र खेचण्यात आले. म्हसरुळ गाव भाजी मार्केट, दिंडोरी रोड येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता सूर्यवंशी (रा. स्नेहनगर) यांच्या तक्रारीनुसार, सायंकाळी ७वाजता म्हसरुळ गावाती भाजी मार्केट येथून भाजीपाला खरेदी करुन पायी घराकडे येत असतांना साईबाबा मंदिरजवळ उमिया फर्निचर दुकानाच्या बाजुला कॉलनी रोडवर दुचाकीवर निळ्या रंगाची जिन्स आणि मास्क घातलेल्या चालकाने अचानक समोर दुचाकी उभी केल्याने सूर्यवंशी घाबरल्या. ही संधी साधून गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने खेचून पलायन केले. अधिक तपास मसरूळ पोलीस करत आहे. दरम्यान संध्याकाळी घराबाहेर पडण्यास महिलावर्ग घाबरत आहे.