न्युज पेपर विक्रेत्यावर तिघांकडून जीव घेना हल्ला.
एमजीरोड परिसरात वृत्तपत्रविक्रेत्यावर तिघांकडून जीवघेणा हल्ला
नाशिक | नाशिक शरद गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवस न दीवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. काल सकाळी एमजीरोड परिसरात बुधवारी (दि. १४) पहाटे ५
वाजेला एका वृत्तपत्रविक्रेत्यावर रिक्षातून आलेल्या तिघा तरुणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. विनाकारण झालेल्या या सशस्त्र हल्ल्याने वृत्तपत्रविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस प्रशासनाने अशाप्रकारे उघडपणे होणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पहाटेदेखील गस्त प्रभावी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अशा घटनांमुळे नागरिकांना मॉर्निंग वॉकला जावे की नाही. नाशिक शहरात रात्री फिरावे की नाही. असा प्रश्न पडला आहे. शहरातला नागरिक सुरक्षित नसेल तर बाहेरून येणारा भाविक पर्यटक कसा सुरक्षित राहील असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. पोलिसांनी रात्रंदिवसग्रस्त वाढवणे महत्त्वाचे झाले आहे.