मविप्र रुग्णालयाच्या प्रांगणात वारकऱ्यांचे स्वागत, आरोग्य तपासणी
मविप्र रुग्णालयाच्या प्रांगणात वारकऱ्यांचे स्वागत, आरोग्य तपासणी
नाशिक : मविप्रचे आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या प्रांगणात त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी जाणाऱ्या चांदवड तालुक्यातील वैष्णवभूषण पूज्य सुजितजी महाराज, देवरगाव, ता. चांदवड यांच्या हरेकृष्ण दिंडी सोहळ्याचे मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी स्वागत केले.
पंढरपूरची आषाढीवारी आणि त्र्यंबकेश्वरची पौषवारी ही वारकरी संप्रदायातील परंपरा व संस्कृती आहे. ती जोपासण्याचे कार्य महाराष्ट्रात चालते. या वारीचे आपण साक्षीदार आहोत, हे या पिढीचे भाग्य असल्याचे प्रतिपादन यावेळी सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी व्यक्त केले.
यावेळी ॲड. ठाकरे यांनी सपत्निक वैष्णवभूषण पूज्य सुजितजी महाराज देवरगावकर यांचे संतपूजन, पालखीपूजन व सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले. मविप्र रुग्णालयाच्या वतीने यावेळी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी हरिपाठ कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मविप्रचे शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. डॉ. भास्कर ढोके, प्रा. डॉ. नितीन जाधव, प्रा. डी. डी. जाधव, प्रा. डॉ. के. एस. शिंदे, प्रा. डॉ. विलास देशमुख, प्रा. डॉ. अजित मोरे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, डॉ. नारायण सोनावणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कवडे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*नाशिक : दिंडीतील पालखीपूजन करताना मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व वंदनाताई ठाकरे. समवेत भाविक.*