नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर मंदिराचे सभामंडपाचे काम पूर्णत्वाकडे
35 देणगीदारांचा होणार सत्कार
नाशिक जनमत
अरुण हिंगमिरे यांच्याकडून – नांदगाव तालुक्यातील जातेगांव पासून उत्तरेस ७ किमी अंतरावर असलेल्या डोंगरावरील श्री पिनाकेश्वर महादेवाचे मंदिरासमोरील सभामंडपाच्या जिर्णोद्धाराचे काम पुर्णत्वाकडे येत असल्याचे शिवभक्त बाबासाहेब चव्हाण आणि रामदास पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन १९६० च्या दशकात राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी पहिले संपूर्ण दगडात हेमाडपंथी पध्दतीचा अवलंब करून लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून श्री पिनाकेश्वर महादेवाचे मंदिराचे काम पुर्ण केले होते. त्यानंतर स्वामींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिव मंदिरे लोक सहकार्याने पुर्ण केले. येथील या मंदिराचे बांधकाम झाल्यानंतर संत गंगागिरीजी महाराज यांच्या देखरेखीखाली १९७० च्या दशकात मंदिराच्या समोरील सभामंडपाचे पुर्ण करण्यात आले. हा सभामंडप जिर्ण झाल्याने ठिकठिकाणी तडे गेल्याने व त्यास डागडुजी करणे शक्य नसल्याने, या सभामंडपास असलेले जुने हेमाडपंथी दगडी खांब तसेच ठेवून बाहेरच्या बाजूला चार सिमेंटचे आर सि सी कॉलम करण्यात आले. व आगोदर असलेल्या सभामंडपापेक्षा उंची दोन फुट आणि दक्षिण व उत्तर दिशेला प्रत्येकी पाच- पाच फुट मोठा करण्यात आला असून या बांधकामासाठी सुमारे ११ लाख रुपये खर्च अपेक्षित असुन हा खर्च ३५ देणगीदार करत आहे. तसेच सभामंडपाचे काम पुर्ण झाल्यानंतर या देणगीदारांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे नाव कोणशिलेवर लिहिण्यात येणार आहे, अशी माहिती बाबासाहेब चव्हाण यांनी दिली, यावेळी रामदास पाटील व रवींद्र पाटील तसेच शिवभक्त उपस्थित होते.