एकाच इमारतीमधील 3 फ्लॅटमध्ये चोरी; २.१५ लाखांचा ऐवज लंपास पंचवटी आडगाव चा तपास

एकाच इमारतीमधील 3 फ्लॅटमध्ये चोरी; २.१५ लाखांचा ऐवज लंपा
प्रतिनिधी |नाशिक जनमत
नासिक मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीचा घरफोडी प्रमाण वाढले आहे. पोलिसांची गस्त कमी पडत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी रात्री या घर फोडी झाले आहेत.
मंगळवारी
पंचवटीतील मेरीमधील साईकलश अपार्टमेंटच्या एकाच मजल्यावरील तीन फ्लॅट्सचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या तीनही फ्लॅटमधील कुटुंबीय बाहेरगावी गेलेले होते. मंगळवारी (दि. १३) मध्यरात्री पाऊस असताना वीज खंडित झाल्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य पाटील (रा. दुगाव, ता. चांदवड) हे पंचवटीतील साईकलश अपार्टमेंटमध्ये राहतात. चोरट्याने पाटील यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. तर शेजारच्या प्रांजली शेवाळे यांच्याही घराचे कु
(दुसऱ्या एका घटनेत
रोहित बर्वे (रा. शिव रोहाउस, कोणार्कनगर) हे बाहेरगावी गेले असताना चोरट्याने त्यांच्या बंद घरातून १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.)
तोडून कपाटातील २ तोळे वजनाचे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर प्रवीण शेजवळ यांच्याही फ्लॅटचे कुलूप तोडून ५ हजार रुपये व २५ हजार रुपये किमतीचे दागिना घेत पोबारा केला. या तीनह घरफोड्यांमध्ये २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून पंचवटी पोलिसांन घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहे.