मनोज जरांगेना महाराष्ट्रात मोगलाई आणायची आहे का ?* भाजप सरचिटणीस सुनील केदार
*मनोज जरांगेना महाराष्ट्रात मोगलाई आणायची आहे का ?*
भाजप सरचिटणीस सुनील केदार
नाशिक ( ) पुर्वी व आजही ग्रामीण भागात एखादी व्यक्ती दादागिरी,दडपशाही, चिथावणीखोर वक्तव्य,मेरी सूनो, वेठीस धरत असेल तर लोक म्हणतात तु वाटेल तसा वागतो व बोलतो तुला काय हे करायची मोगलाई लागली का ? अगदी तसाच प्रकार महाराष्ट्रात मनोज जरांगे करत आहेत.याला पाडा,त्याला निवडूण आणा, याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्याचा कार्यक्रम करा, सरकार चालु देणार नाही, मंत्र्यांना गावबंदी करा, राज्यात फिरू देऊ नका, घरात घुसून मारा, जाळपोळ करा असे बेताल वक्तव्ये करून मनोज जरांगे समाजा समाजात वातावरण दूषित करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे यांचे नाव पुढे आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हे सर्वांनाच मान्य आहे. पण ते कायद्याच्या चौकटीत राहून दिले गेले पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत आहे व त्यादृष्टीने त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पध्दतीने निर्घृण हत्या झाली त्याचे कोणीही समर्थन करत नाही व करणारही नाही. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हे सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांचे आमदार,खासदार, नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मत आहे.
गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणुन नावलौकिक मिळविला होता. मुंबई येथे त्याअगोदर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मुंडे यांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारांना वठणीवर आणले होते. त्यावेळी मुंबई पोलिस उपायुक्त डी पी आव्हाड यांनी अनेक नामचीन गुन्हेगारांना यमसदनी पाठविले होते. गोपीनाथ मुंडे यांच्याच कार्यकाळात महाराष्ट्र राज्यातील गुन्हेगारी आटोक्यात आली होती. गुन्हेगारांना विमानात काही नेत्यांनी नेल्याचे प्रकार पूर्वी घडले आहेत. गुन्हेगारांना कदापी राजाश्रय दिला जाऊ नये अशी कठोर भुमिका मुंडे यांनी घेतली होती तशीच भुमिका आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. असे असताना केवळ राजकीय आकस म्हणुन मंत्री धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांना टार्गेट करून मनोज जरांगे व काही नेते महाराष्ट्रात वातावरण कलुशित करत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना भर चौकात फाशी द्या पण या दुर्दैवी घटनेचे राजकारण कोणीही करू नये व महाराष्ट्रात जाती जातीत तेढ निर्माण करू नये असे आवाहन सुनील केदार यांनी केले आहे.