राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट मंदिरे स्वच्छता अभियान संपन्न*

*राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट मंदिरे स्वच्छता अभियान संपन्न*
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती समारोह कार्यक्रमा अंतर्गत राजमाता अहिल्यादेवींनी निर्माण केलेले घाट,मंदिर व त्यांच्या स्मारकाची स्वच्छता अभियान बुधवार दि.२१/०५/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा
अहिल्याराम व्यायामशाळा पटांगण,दुतोंड्या मारुती समोर भाजपा नाशिक महानगराच्या वतीने रबविण्यात आले. यावेळी श्रीमंत महाराज होळकर सरकार संस्थान इंदूर यांच्याद्वारे अहिल्यादेवी होळकर यांनी शके सतराशे सात मध्ये बांधलेल्या विश्वेश्वर मंदिरात अहिल्या घाट पंचवटी येथे स्वच्छता अभियान राबवून शंखनाद देखील करण्यात आला. तसेच अहिल्या राम मंदिरात पैठणी गुरुजी यांच्या पाठशाळेच्या वतीने मंत्रोच्चाराचे पठण करण्यात आले यायाप्रसंगी भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.केंद्र व प्रदेश भाजपाने दिलेला राजमाता अहिल्यादेवी 300 वा जयंती समारोह कार्यक्रम मोठया प्रमाणावर करणार व त्यांच्या कार्य कतृत्वाची माहिती सर्व सामान्यापर्यंत पोहचवणार असल्याचे प्रशांत जाधव यांनी सांगितले.याप्रसंगी भाजपा शहर सरचिटणीस श्याम बडोदे सुनील केदार नाना शिलेदार राजेंद्र मोरे ,बापू
शिंदे अजय आघाव उत्तमराव सागर शेलार ,राहुल कुलकर्णी सोनाली कुलकर्णी सुजाता करजगीकर मीनल भोसले गीता वाघमारे उगले देवदत्त जोशी मदन निकम अरिफ काजी सचिन मोरे प्रतीक शुक्ल महेश , शंतनु शिंदे,शरद काळे,भगवान कालेकर, गोरख खैरनार,अशोक खैरनार, सुरेश सोनवणे, राजेश मोहीते,,महांकाळे दिगंबर धुमाळ हेमंत शुक्ल प्रवीण आहेर ज्ञानेश्वर काकड विशाल जेजुरकर प्रसाद धोपावकर प्रवीण भाटे वैभव क्षेमकल्याणी पवन जोशी सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते …