नायगावला बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला. शेतकऱ्याने दिली बिबट्यांशी झुज.
नाशिक जनमत सिन्नर प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील नायगाव येथे शेतकरी सोमनाथ वाबळे हे सकाळी आपल्या शेतात राऊंड मारण्यासाठी गेले होते राहून मारल्यानंतर घरी परतत असताना बिबट्याने त्यांच्या मागून त्यांच्यावर झडप घातली अचानक झालेल्या बिबट्याच्या आल्यामुळे शेतकरी सोमनाथ वाबळे यांनी हिम्मत न हरता बिबट्याशी दोन हात केले. यात सोमनाथ वाबळे जखमी झाले मानेवर तसेच उजव्या हातावर बिबट्याचे दात लागल्याने जखमा झाले आहेत त्यांच्यावर दवाखान्यात उपचार चालू आहे या घटनेमुळे नायगाव परिसरात श संग्रहित दृश्य .
खळबळ उडाली असून वन विभाग कर्मचारी बिबट्या पकडण्याच्या तयारीत असून प्रयत्न करत आहे. दरम्यान शेतकरी सोमनाथ वाबळे यांच्या हिमतीचं कौतुक नायगाव परिसरात होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात मक्का ऊस इत्यादी शेतांमध्ये पीक असल्याने बिबटे लपून बसतात. वन विभागाने या भागात पिंजरे लावण्याची मागणी नागरिक करत आहे.