आरोग्य व शिक्षण

इंदिरानगर पोलीस ठाणे कडील* *14 बेवारस मोटर सायकलींचा होणार लिलाव*

  1. *इंदिरानगर पोलीस ठाणे कडील*
    *14 बेवारस मोटर सायकलींचा होणार लिलाव*

    *नाशिक,
    इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील बेवारस स्थितीत, कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी पॉईंट व वाहन चेकींग मध्ये जमा करण्यात आलेल्या बेवारस 14 मोटर सायकलींचा लिलाव इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या आवारात 28 जानेवारी 2023 रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी दिली आहे.

वरील 14 बेवारस मोटार सायकल यांच्या मालकास पत्रव्यवहार केला असून दैनिक वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तरीही मुळ मालकांनी अद्यापपावेतो मालकी हक्काबाबत कोणतेही कागदपत्र सादर केलेले नाही. या वाहनांची प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून तपासणी करून मुल्यांकन केले असून लिलावास माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांची रितसर परवानगी घेण्यात आली आहे.

सरकारी नियमाप्रमाणे वरील 14 वाहनांचा 28 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता लिलाव करण्यात येणार आहे. लिलाव घेणाऱ्या व्यावसायीकांनी 7 दिवसांच्या आत इंदिरानगर पोलीस ठाणे येथे रूपये 50 हजार अग्रीम रक्कम भरून आपल्या निविदा बंद लिफाफ्यामध्ये जमा कराव्यात, असेही इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे