आरोग्य व शिक्षण

त्र्यंबकरोडवर मधमाशांच्या हल्ल्यात कॉलेजचे १६ विद्यार्थी जखमी; २ गंभीर

त्र्यंबकरोडवर मधमाशांच्या हल्ल्यात कॉलेजचे १६ विद्यार्थी जखमी; २ गंभीर

 

त्र्यंबकरोडवरील संदीप फाउंडेशनमधील घटना

 

प्रतिनिधी |नाशिक जन्मत    नाशिक शहरापासून जवळ असलेल्या महिरावणी परिसरातील  संदीप फाऊंडेशन या कॉलेजमध्ये एका इमारतीवर असलेले मधाचे पोळे अचानक खाली पडल्याने मधमाशांनी अनेक विद्यार्थ्यांना चवा  घेऊन जखमी दिले. यात दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

त्र्यंबकरोडवरील संदीप फाउंडेशनच्या आवारात मधमाशांचे पोळे अचानक वरून खाली पडल्याने १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. ४) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दोघांच्या डोळ्यात व कानात मधमाश्यांनी चावा घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून इतर १४ विद्यार्थी जखमी

झाले असून त्यांच्यावर अशोकनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या एस बिल्डिंग क्लॉक टॉवरजवळ मधमाशांनी हा हल्ला केला.

या घटनेत शुभम गुंजाळ याला मधमाशांनी घेरल्याने गंभीर दुखापत झाली आहे. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते. जखमींमध्ये आकांक्षा पाटील, अंशी कसबे, भावेश राऊत, प्रसन्नजीत वाघोळे, मोहित जाधव, संदीप शेरे, महेश बोरसे यांचा समावेश आहे. या घटनेमुळे महाविद्यालयात गेलेले विद्यार्थी देखील संध्याकाळी सुखरूप घरी येतील की नाही अशी काळजी पालकांना पडलेली आहे. अनेक महाविद्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी मधमाशांचे पोळे बसतात. यासाठी शाळा कॉलेज ऑफिसेस यांनी योग्य कारवाई करून मधमाशा बसण्या अगोदरच उपायोजना करणे गरजेचे झाले आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे