नासिक मध्ये एका दिवसात तीन अपघात चार जण गंभीर जखमी.
तीन वेगवेगळ्या अपघातांत ४ गंभीर
नाशिक | जनमत नाशिक शहरांमध्ये वाढती लोकसंख्या ध्यानात घेता रस्त्यांची रुंदीकरण. तसेच सिग्नल व्यवस्था गतिरोधक यांचे नियोजनबद्ध नसल्याने नेहमी अपघात होत असतात काल नाशिक शहरांमध्ये पंचवटी, आडगाव, नाशिकरोड येथे
झालेल्या अपघांतात ३ गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कैलास पेखळे (रा. ओढा) यांच्या तक्रारीनुसार, सायंकाळी ७.३० वाजता कामावरुन घरी जाताना संभाजीनगररोडवर ओढा रेल्वे गेट नंबर ९३ येथे घराकडे वळण घेत असताना दुचाकीने धडक दिल्याने पेखळेंच्या डोक्यास गंभीर मार लागला. दीपेन वेद (रा. लामखेडे मळा) रात्री ८.४५ वाजता दिंडोरीरोडने म्हसरुळकडे जात असताना दिंडोरीनाका येथे रस्ता ओलांडताना दुचाकी धडक दिली तर विठ्ठल केंधळे (रा. पळसे) हे मित्र अशोक मंडल यांच्या दुचाकीने जात असताना भीमनगर, जेलरोड येथे लाल रंगाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने केंदळे व मंडल गंभीर जखमी झाले. दरम्यान अनेक सिंगल व्यवस्थेवर दुपारी एक ते चार च्या दरम्यान पोलीस हजर नसल्याने वानधारक बिंदास सिंगल तोडतात परिणामी एकमेकाची धडक होऊन अपघात होत असतात.. दुपारी एक ते चारच्या दरम्यान पोलिसांचा लंच टाईम असतो. या वेळेस देखील जेवणाच्या वेळा बदलून दुपारी सिग्नलवर पोलीस व्यवस्था असणे महत्त्वाचे झाले आहे. वाहनांवर वेगाचे नियंत्रण असावे जीवन अमूल्य आहे. दोन मिनिटांची चूक महाग पडते त्यामुळे वान धारकांनी आपली वाहने जपून चालावीत असे नाशिक जनमत चंद्रकांत धात्रक यांच्याकडून जनहितार्थ आपणास विनंती.