. कृषिमंत्री कोकाटेंना नवसंजीवनी; शिक्षेस स्थगिती, मंत्रिपद वाचले

कृषिमंत्री कोकाटेंना नवसंजीवनी; शिक्षेस स्थगिती, मंत्रिपद वाचले
नाशिक जन्मत प्रतिनिधी बनावट पेपरच्या साह्याने मुख्यमंत्री निधीतून प्लॉट खरेदी केल्याने अडचणीत सापडलेले माणिकराव कोकाटे यांच्यावरच. संकट सध्या ठरले आहे.
दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याने अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. ५) शिक्षेचे अपील पूर्ण होईपर्यंत स्थगिती दिल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्हा न्यायालयाच्या या निकालामुळे त्यांचे धोक्यात आलेले मंत्रिपद व अपात्र ठरणारी आमदारकीही शाबूत राहणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्यावर येणारे संकट टळले आहे.
बनावट दस्तावेजाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या राखीव कोट्यातील फ्लॅट बळकावल्याच्या प्रकरणात तब्बल २९ वर्षांनी सत्र न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी मंत्री कोकाटे व त्यांचे बंधू विजय यांना २ वर्षे सक्तमजुरी व ५० हजारांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेस स्थगिती मिळण्यासाठी कोकाटे यांनी केलेल्या आव्हान याचिकेवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश नितीन जीवने यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान सिन्नर येथे कोकाटे समर्थकांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाच् आनंद व्यक्त केला.