ब्रेकिंग

प्रदीप मनोहर पाटील. यांच्या कविता संग्रह.व छान माहिती.

[3/3, 5:30 PM] +91 99222 39055: राष्ट्रीय पुत्र दिवस. ( 4 मार्च )

 

जन्म देतात मुलांना

माता सांभाळते त्यांना

बाळ आवडे सर्वांना

आनंद लाभ जीवांना .

 

माता पिता जन्मदाते

पुत्राचे भाग्यविधाते

असतात तेच दाते

ईतर सारी चाहते.

 

नीट भारी शिकवण

संस्काराने भरी मन

देतं बाळाला शिक्षण

अंतरात आठवण.

 

संगोपन जोपासना

व्हावी साऱ्यांची उत्तम

दिवस अंगीकारला

ठेवा असे कार्यक्रम.

 

पुत्र आणि पालकांचा

व्हावा येथेच सन्मान

जोपासत नातीगोती

माणसांना मानपान.©️®️

 

प्रदीप मनोहर पाटील

गणपूर तालुका चोपडा

जिल्हा. जळगाव.

मो. 9922239055

[3/3, 5:30 PM] +91 99222 39055: वन्य जीव जीवन

 

वाघ सिहं हत्ती घोडा

सर्प सरडा हरणी

अधिवास रानिवनी

खाद्य शिकार करुनी.

 

जीव जीवश्य जीवन

गीता सांगे सारा सार

दृष्टी पडे वारंवार

जगता करतं वार.

 

शांत संयमी दिसते

मन पाहुन ठसते

कधी क्रूरता भासते

कुठं मोहक भावते.

 

आली टप्प्यात शिकार

होतो त्यावर प्रहार

वरून टिपते घार

चोफेर दिसता वार.

 

बळी तोचि जगी जीव

कोणा नसे त्यांची कीव

कळपात साथ देतं

सांभाळ कार्य भरीव.

 

जीव लावता जातींचे

मार दुसऱ्या प्रजाती

खेळ जीवन सुंदर

वृक्ष आकाशी भिडती.

 

प्राणी पशुपक्षी रक्षी

एकमेकांना सारीच

मारी दुसऱ्याला तीच

जगणं त्यांच भारीच.©️®️

 

प्रदीप मनोहर पाटील

गणपूर तालुका चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055

[3/3, 5:30 PM] +91 99222 39055: जागतिक वन्यजीव दिन (3मार्च)

 

 

सृष्टी चक्रात खूपच

सुष्म मोठाली लहान

वन्य असतात जीव

कार्य त्यांचही भरीव.

 

जगतात तीच भारी

प्राणी असता करारी

दुनिया त्यांची निराळी

पक्षी घेतात भरारी.

 

जाती प्रजाती अंनत

वाटतात काही संत

जगी वृक्ष्यावर काही

शांत संयमी महंत.

 

क्रूर शिकारीही प्राणी

गुंजे त्यांची डरकाळी

शिकारी सोडता गोळी

जीव असतात भोळी.

 

वाचली पाहिजे जीव

राहती सारी सजीव

करूत त्यांचीचं कीव

कार्य असावं भरीव.

 

संरक्षण त्यांचं करू

लुप्तप्राय वन्यजीव

व्हायला नको म्हणून

सुरु दिन वन्यजीव.©️®️

 

प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055

[4/3, 3:55 PM] +91 99222 39055: राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस

 

दात असता बत्तीस

आतील जीभ एक

कार्य करता सुरेख

माणसं जगता नेक.

 

सुरक्षा दातांची करू

चिकित्सा त्याचीच सुरु

डॉक्टर झालीत गुरू

जगणं त्यावर सुरु.

 

दात असती निरोगी

शरीर नसती रोगी

नसावेत तीच डागी

काळजीचं उपयोगी.

 

स्वच्छ नियमित करू

हास्य त्यातून खुलवू

शुभ्र त्यांना चमकवू

निरोगमय ती ठेवु.

 

आला चिकित्सा दिवस

खाद्य चावूनच खास

किडीचा नकोच वास

येवो त्यातून सुवास.©️®️

 

प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055

[4/3, 3:55 PM] +91 99222 39055: राष्ट्रीय सुरक्षा दिवस

 

मातृभूमी रक्षा करी

सैनिकच सीमेवरी

सेवा त्यांची सदैवता

रोख त्यांचा शत्रूवरी.

 

अंतर्गत शत्रू फार

करता आतून वार

करू त्यावर प्रहार

मिळून त्यांचा संहार.

 

 

सुरक्षा सारीच खरी

काळजी स्वतःच घेऊ

ताण कमीच देऊत

सुरक्षित स्वतः राहू.

 

युद्धाची जमा सामुग्री

बंदूक ते अग्निबाण

रणगाडा तोफखाना

वर उडतं विमान.

 

भारत भुमाता रक्षु

कार्य सैनिका भरीव

शिल्प त्यांचंचं कोरीव

सैनिक दल राखीव.©️®️

 

प्रदीप मनोहर पाटील

गणपूर तालुका चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055

[4/3, 3:55 PM] +91 99222 39055: आपली सुरक्षा

 

करू स्वतःचं सुरक्षा

धडे घेऊ आत्मरक्षा

कमवु शरीर यष्टी

तत्पर असूत रक्षा.

 

सोबत इतरांचीहि

घेऊ काळजी सारीच

दृष्ट्रावर पडु भारी

मित्र मैत्रीत यारीच.

 

लढायची ती तयारी

एक राहू सारी जन

सु राष्ट्र करू निर्माण

ठेवुत शांतीचं मन.

 

वसाच सुविचारांचा

निर्माण करू माणसा

साथ देऊ दिन दुःखी

झोडपू दृष्ट दिवसा.

 

शक्ति करू बळकट

हात घेऊन हातात

वार करतं पोटात

वावरू सारी थाटात.©️®️

 

प्रदीप मनोहर पाटील

गणपूर तालुका चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे