शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये तीन दिवसांचा नोकरी कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

*शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये तीन दिवसांचा नोकरी कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन*
नाशिक : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, आगासखिंड च्या ट्रेनिंग एंड प्लेसमेंट सेल तर्फे ‘अस्पायरिंग करिअर्स’ व ‘सारथी फाऊंडेशन, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय नोकरी कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रथम व द्वितीय वर्षातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रशिक्षणामध्ये संवाद कौशल्य, प्रभावी सादरीकरण तंत्र, रेस्यूम लेखन, मुलाखत तंत्र, टीमवर्क, नेतृत्वगुण, समस्यांचे समाधान, निर्णय क्षमता आणि उद्योगजगतासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये अशा महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीवर आधारित सराव, रिअल-टाईम उदाहरणे आणि प्रात्यक्षिकांद्वारे शिकवले गेले.
या कार्यशाळेचे मार्गदर्शन अनुभवी प्रशिक्षक बिमला सक्सेना यांनी केले. त्यांना विक्री व्यवस्थापन, उद्योजकता, कॉर्पोरेट कौशल्य आणि व्यवसाय विकास क्षेत्रातील १८+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या उत्साही आणि परिणामकारक प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
संस्थेचे विश्वस्त मा. श्री. प्रितम वीर सर आणि डॉ. स्नेहा वीर मॅडम यांचे कार्यशाळेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉ. पंकज विसपुते सर आणि उपप्राचार्या डॉ. सपना सोनार मॅडम यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि ट्रेनिंग व प्लेसमेंट चे ऑफिसर श्री गोकुळ महाजन सर यांच्या सहाय्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभाग प्रमुख, संकाय समन्वयक, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा कौशल्यवृद्धी उपक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने यापुढेही करण्यात येईल, असे मत प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलच्या समन्वयकांनी व्यक्त केले.