गुन्हेगारी
पेठ रोड वरील घटना वाहनाला हात दाखवून थांबण्यास भाग पाडले. 35000 ची लूट.

प्रतिनिधी |
नाशिक जन्मत
वाहनाला हात दाखवून थांबवत चालकाला मारहाण करत खाली उतरवून देत वाहन पळवून नेले. निर्जनस्थळी वाहनाच्या डिक्कीत ठेवलेली द्राक्ष भाड्याची ३५ हजारांची रक्कम लुटून नेल्याचा प्रकार पेठ रोडवरील एका पेट्रोलपंपासमोर घडला.
याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित देवरे (रा. त्रिमूर्ती चौक सिडको) यांच्या तक्रारीनुसार रात्री वाहन पेठरोड येथून येताना तीन अनोळखी इसमांनी वाहन थांबवले. संशयितांनी देवरेंना वाहनातून उतरवत वाहन पळवून नेले. देवरे वाहनामागे पळत जात असताना त्यांना एका हॉटेलजवळ वाहन दिसले. डिक्कीतील रक्कम संशयितांनी लुटून नेल्याचे आढळले.