सरपंच संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी. धनंजय मुंडे यांचा राजीनामा.

( ही छायाचित्र वाचकांना विचलित करू शकतात )
नाशिक जन्मत प्रतिनिधी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपींचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले असून जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीने ८० व्या दिवशी दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींनी देशमुखांना अमानुषरीत्या मारहाण करीत त्यांची हत्या केली. त्याचे व्हिडिओ व फोटो दोषारोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत. हेच पुरावे म्हणून न्यायालयापुढे सादर होतील. सोमवारी ही छायाचित्रे व्हायरल झाली.
काल अत्यंत हाल हाल करून संतोष देशमुख यांना मारण्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले असून. संपूर्ण घराघरांमध्ये व जनतेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच एक कृत्य झाल्याचे बोलल्या जात आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी अनेक दिवसापासून म्हणून मनोज जरांगे व आमदार धस यांची मागणी होती आज अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या पीए च्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी तर राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान याबद्दल पंकजा मुंडे यांनी सांगितले की शपथ घेण्या अगोदरच राजीनामा दिला पाहिजे होता. तर अजित पवार यांनी सांगितले की राजीनमा नियुक्तीच्या मुद्द्यामुळे दिला आहे. तर धनंजय मुंडे यांनी टेवीट करताना की सांगितले की वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देत आहे असे सांगितले. तर जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की धनंजय मुंडे हेच मुख्य सूत्रधार आहेत त्यांना क डक शिक्षा झाली पाहिजे.
( ही छायाचित्र वाचकांना विचलीत करू शकतात )
मुख्यमंत्री यांनी सांगितले की राजीनामा मी स्वीकारला असून तो राज्यपालाकडे पुढील कारवाई साठी पाठवला आहे.. दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहे. आरोपी विषयी तीव्र चीड निर्माण झालेली आहे..