गुन्हेगारी
बंगाल मधून चोरी करणारा अटकेत. मखमला बाद नाका येथे चोरले होते दागिने

प्रतिनिधी । नाशिक जन्मत पर राज्यातील तरुण नाशिक मध्ये येऊन चोरी करून जात असल्याचे अनेक घटना वरून प्रत्यक्ष समोर येत आहे 20 दिवसापूर्वी अशीच घटना मग मखमबाद नाका भागात घडली होती याबाबत सविस्तर वृत्त असे की
पंचवटीतील मखमलाबाद नाका भागात सोन्याचे दागिने व कलाकुसर बनविण्याचे छोटेसे दुकान टाकणाऱ्या कारागिरानेच परिसरात राहणाऱ्या महिलेचे सुमारे १० तोळे वजनाचे ७ लाखांचे व इतर महिलांचे ३ लाखांचे असे १० लाखांचे सोने लंपास केले होते. या प्रकरणात फरार झालेल्या संशयित अमित भुनिया या कारागिरास गुन्हा शाखेच्या युनिट क्र. १ च्या पथकाने पश्चिम बंगालमधील रबिदासपूर (जि. पश्चिम
मेदिनीपूर) येथून ताब्यात घेतले आहे.
मखमला बाद नाका भागातील खांदवे निवास येथे राहणाऱ्या संगीता माळवे यांच्या तक्रारीनुसार, पंचवटी पोलिस ठाण्यात ३ फेबुवारीला त्यांच्या घराजवळच सराफी कारागिरी करणाऱ्या संशयित अमित भुनियाने १० तोळे वजनाचे दागिने लांबवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. माळवे यांनी दागिने बनविण्यासाठी कारागीर भुनियाकडे सोने दिले होते. संशयित हा त्यांच्या परिसरातच भाडेतत्त्वावर रहात असल्याने ओळखीचा होता.
( या घटनेवरून असे ध्यानात येते की भाडेतत्त्वावर रूम देणाऱ्या घरमालकांनी पर राज्यातील भाडे कडून आयडी कार्ड ओळखीचा पुरावा करून घ्यावा. कारण की चोरी करून गेल्यानंतर घर मालकाला पोलीस चौकशीसाठी समोर जावे लागते.)
त्याने त्याचाच गैरफायदा घेत माळवे यांच्यासह आणखी काही महिलांचे दागिने बनविण्यासाठी चोख सोने घेतले आणि तो फरार झाला होता. युनिट एकचे कर्मचारी उपनिरीक्षक बागूल, संदीप भांड, प्रवीण वाघमारे यांनी गोपनीय माहिती काढली असता भुनिया हा त्याच्या मूळगावी रबिदासपूर (जि. पश्चिम मेदिनीपूर) येथे, गेल्याचे समजले. पथकाने स्थानिक
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा.9273020944.
पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. संशयिताकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.