विद्यार्थ्यावर पाथर्डीजवळ काळाचा घाला दुचाकी घसरून पाणीपुरीच्या गाडीवर आढदाळली. मानेत घुसली काच.
* विद्यार्थ्यावर पाथर्डीजवळ काळाचा घाला
न दुचाकी घसरून पाणीपुरीच्या गाडीवर धडकल्याने गाडीची काच मानेत घुसली
| नाशिक जन्मत प्रतिनिधी
– वेदांत कळस्कर हा विद्यार्थी . इंदिरानगर लायब्ररीमधून पुस्तक घरी घेऊन येत असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने कट मारल्याने रस्त्याच्या खटकीहून दुचाकी खाली उतरल्याने
• दुचाकीसह तोल जाऊन पाणीपुरीच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला. पाथर्डी फाट्याकडून इंदिरानगरकडे जाताना हा अपघात घडला. याप्रकरणी
इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेदांत विशाल गुळसकर (१६, रा. वज्रभूमी रोहाउस, तुळजाभवानी
(वेदांत चे वडील म्हणतात माझा आधार गेला माझा मित्र गेला.)
(• वेदांत माझा मुलगा असला तरी तो माझा मित्र होता. माझी सर्वाधिक काळजी तो घेत असे. बोलका स्वभाव असल्याने तो शाळेत, मित्रमंडळी आणि नातेवाइकांसह शिक्षकांचा लाडका होता. माझा आधार केला, मी मित्र गमवला. – विशाल गुळसकर, वडील)
मंदिराजवळ, वडाळा-पाथर्डीरोड) हा मुलगा सायंकाळी ५.३० वाजता दुचाकीने लायब्ररीमधून पुस्तक घेऊन घरी जात असताना वडाळा-पाथर्डी रोडवर पाठीमागून अनोळखी वाहनाने दुचाकीला धडक दिली यामध्ये पाणीपुरीच्या गाडीवरील काच मानेत घुसल्याने वेदान्त चा मृत्यू झाला अतिशय दुर्दैवाची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.