नाशिकरोडला माजी नगरसेवकाच्या घरी 31 लाखांची भरदिवसा घरफोडी.

नाशिकरोडला माजी नगरसेवकाच्या घरी 39 लाखांची भरदिवसा घरफोडी
प्रतिनिधी नाअशोक जन्मत । नाशिक शहरामध्ये नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. दोनच दिवसापूर्वी मग मला बाद महालक्ष्मी नगर अंबड परिसरामध्ये भर दिवसात चोऱ्या. दरोडा पडला होता. आता सरसपणे चोर दिवसात चोऱ्या करू लागले आहेत . यामुळे नागरिकांमध्ये घबराडीचे वातावरण तयार झाले आहे काल नाशिकरोड
येथील शिखरेवाडी परिसरातील प्रकाशनगरातील अंगण छाया सोसायटीतील माजी नगरसेवकाच्या घरी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी घरफोडी करून १५ लाखांचे सोन्याचे दागिने व १६ लाखांची रक्कम असा ३१ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे (उबाठा) माजी नगरसेवक सुनील बाबूराव गोडसे हे नेहमीप्रमाणे कामावर गेले. तर त्यांच्या पत्नी ज्योती या दुगाव येथे नातलगांकडील सोहळ्यासाठी गेल्या होत्या. ही संधी साधत चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमधील लाकडी कपाट आणि बेडरूममधील कपाट फोडून १६ लाखांचे सोन्याचे दागिने, तर १५ लाख रुपये रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी घरातील कपाटातील वस्तू जमिनीवर अस्ताव्यस्त फेकलेल्या होत्या. मुलगा ओमकार घरी आल्यावर ही बाब लक्षात आली. सराई चोरांनी
१५ लाखांचे सोन्याचे दागिने, १६ लाखांची रक्कम लांबवली
या मध्ये चोरीस गेलेले सोन्याचे दागिने
प्रकार सोन्याचे वेढे आणि बिस्किटे ब्रेसलेट (२० ग्रॅम) सोन्याचे ४ कडे (१५ ग्रॅम) सोन्याची चैन (१२ ग्रॅम) सोन्याची चैन (१० ग्रॅम) कर्ण फुले (५ ग्रॅम) सोन्याची अंगठी (३ ग्रॅम) सोन्याची अंगठी (५ ग्रॅम)
१० फेब्रुवारी रोजी : पेठरोड
येथील एका बिअर बारचे पत्रे काढून ७० हजारांचे मद्य आणि रोख रक्कम चोरी करण्यात आली.होती
१० दिवसात घरफोडीच्या ४ घटना, तपास संथगत
आडगाव येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीत ४० हजारांचे दागिने चोरी करण्यात आले. असे अजून दोन प्रकार घडले आहेत. दरम्यान कालच्या घटनेचे सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण केद झाले आहे. आरोपी एका मोटरसायकलवर आले होते. पाठीवर मोटरसायकलवर बॅग लावून जाताना दिसत आहे.
सीसीटीव्हीत दुचाकीने जाणारे चोरटे कैद
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता पोलिसांना मिळालेल्या फुटेजमध्ये दोन युवक तोंडाला रुमाल बांधून पाठीवर पिशवी घेऊन दुचाकीवरून येताना व जाताना दिसत आहे. हा धागा मिळाल्याने उपनगर पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे. नाशिकरोड भरदिवसाही घरफोडी होत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. नागरिकांनी पोलिसांनी दिवस-रात्रग्रस्त वाढावी अशी मागणी केली आहे
पोलिस गस्त वाढवावी
• भरदिवसा या भागात चोऱ्या होत
आहेत. यामुळे परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत या भागात पोलिसांची गस्त होत नसल्याने पोलिसांनी तातडीने गन वाढवावी. तसेच या घरफोडीती संशयितांना त्वरित जेरबंद कराव असे नागरिक बोलत आहे. अधिक तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत.
–