आरोग्य व शिक्षण
श्री चैतन्य टेक्नो स्कूलसाठी अभिमानाचा क्षण!

श्री चैतन्य टेक्नो स्कूलसाठी अभिमानाचा क्षण!
श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या इयत्ता ८वी ‘बी’ वर्गातील शाहू पिंगळ याने राज्य स्तरीय डीएसओ स्क्वॅश स्पर्धेत (अंडर-१४) कांस्य पदक पटकावून राष्ट्रीय स्तरावरील डीएसओ स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे!
विशेष म्हणजे, तो नाशिकमधून राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्या या ऐतिहासिक यशाने संपूर्ण नाशिकचा सन्मान वाढवला आहे!
या अभूतपूर्व यशाबद्दल शाहूच्या पालकांसह श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे AGM श्री गणेश गुप्ता, मुख्याध्यापिका सौ. प्रतीक्षा सिंग, व्यवस्थापक श्री विनायक राजगुरू आणि अकॅडमिक डीन श्री चंदू डोंनापट्टी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या.
नासिक जनमत परिवारातर्फे शाहूच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! 💐👏