संशयातून नात्यातीलच प्रेयसीच्या पोटात भोसकला चाकू; जॉगर्सने पकडून चोपले प्रेम प्रकरणाचा संशय .

कान्हेरे मैदानावर घटना; दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून वाद
संशयातून नात्यातीलच प्रेयसीच्या पोटात भोसकला चाकू; जॉगर्सने पकडून चोपले
प्रतिनिधी । नाशिकजन्मत नाशिक मध्ये प्रेम प्रकरणाच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे यामध्ये एकतर्फी प्रेमातून या घटना घडत आहे गेल्या महिन्यात चार घटना घडलेल्या आहेत. काल पुन्हा या घटनेची पूर्णवती नाशिकच्या अनंत काणेकर मैदानावर घडलेली आहे.
नातेसंबंधातील युवतीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाचा तिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्याने सोमवारी (दि. १०) सकाळी थेट हुतात्मा अनंत कान्हेरे जॉगिंग ट्रॅक गाठत तिच्या पोटात चाकू भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने ट्रॅकवरील इतर महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे हल्लेखोर बिथरला. त्याच्या हातातील चाकूमुळे सुरुवातीला सर्वच दोन पावले मागे आले. मात्र काही क्षणांतच जॉगर्सने त्याला पकडून बेदम चोप दिला. ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांच्या स्वाधीन केले तर न्युवतीलाही रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुंबईनाका पोलिसांनी याबाबत सांगितले की, संशयित युवक केदार जंगम याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले बाहे. सोमवारी (दि. १०) सकाळ
तरुणीने केदारला चर्चा करण्यासाठी ट्रॅकवर बोलावले होते. तो सकाळी साडेनऊ वाजेच्यां सुमारास तेथे पोहोचलाही होता. त्याचवेळी ही तरुणी तिच्यासोबत सराव करणाऱ्या मित्रासोबत बोलत होती. केदार तेथे आल्यावर त्यांची चर्चा सुरू झाली. ती त्याला काही गोष्टी समजावून सांगत होती. मात्र, काहीही न ऐकता केदारने खिशातून धारदार चाकू काढून थेट तिच्या पोटातच भोसकला, यात, दोन घाव वर्मी लागल्याने मोठ्या प्रमाण
रक्तस्त्राव होऊन ती जागेवरच कोसळली. हा प्रकार काही नागरिकांनी बघता
आरडाओरड केली. त्यातून संशयित जंगम हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच काही जॉगर्सने त्यास पकडले. त्याच्या हातातील चाकू त्याने बाजूला फेकताच नागरिकांनी त्यास बेदम चोप दिला. त्याचवेळी ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना कळविताच मुंबईनाका पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
तरुणीची प्रकृती चिंताजनक
या घटनेत तरुणी जबर जखमी झाली, रक्तस्त्राव झाल्याने ती जागेवरच
कोसळली, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय
अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ज्या
मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय
होता. तरुणीने त्याला व त्याच्या मैत्रिणीला
बोलावून घेत खरे-खोटे करण्याचा प्रयत्
केला होता.
दुसरे युवकाची प्रेम संबंध असल्याचा त्याला संशय होता
. त्यामुळे तो दोन दिवसांपासून अस्वस्थच होता. यावरून त्या दोघांमध्ये वादही झाले, हे वाद सामंजस्यातून सुटावे त्यासाठीच तिने त्याला चर्चा
करण्यासाठी मैदानाव बोलावले होते. त्यावेळी दुसऱ्या मित्राशी बोल असल्याने केदारचा आणखी संताप झाला आणि तिच पोटात चाकू भोसकला. मुलीची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. प्रेम प्रकरणाच्या घटनेतून खुना पर्यंत युवकांची हिंमत गेलेली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.