सिडकोत घरफोडी, दीड लाखाचा ऐवज लंपास..

सिडकोत घरफोडी, दीड लाखाचा ऐवज लंपास.
नासिक जनमत घरफोडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ. पोलिसांची गस्त फक्त देखाव्यापूर्वती. आहे. असे असे संतपनागरीक बोलत आहे घराच्या लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने, रोकड व घड्याळ असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडकोत घडली. फिर्यादी संतोष शंकर ठाकूर (रा. स्वामी विवेकानंद चौक, सिडको) यांच्या राहत्या घराच्या लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाटात असलेली दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, २० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी २५ हजार रुपयांची रोख रक्कम, दहा हजाच रुपये किमतीचे होबलेट कंपनीचे घड्याळ, दह हजार रुपये किमतीचे रोलेक्स कंपनीचे घड्याळ व ३० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीच टीव्ही असा एकूण १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.