मुख्याध्यापकाचा शिक्षकाच्या मदतीने विद्यार्थिनीवर अत्याचार इगतपुरी तालुक्यातील घटना : दोघांना अटक, पोस्को
मुख्याध्यापकाचा शिक्षकाच्या मदतीने विद्यार्थिनीवर अत्याचार
इगतपुरी तालुक्यातील घटना : दोघांना अटक, पोस्को अन्वये गुन्
घोटी :नाशिक जन्मत मागील काही दिवसांमध्ये अनेक घटना बलात्काराच्या घडल्या असून गुन्हेगारांवर कडक कारवाई केली देखील केली जात आहे तरी आशा घटना घडत आहे काल इगतपुरी तालुक्यात एका
गावातील खासगी शाळेत शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्याच मुख्याध्यापकाने आपल्या सहकारी शिक्षकाच्या मदतीने अत्याचार केल्याची घृणास्पद घटना शुक्रवारी (दि.७) घडली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात संतापाची लाट पसरली असून सदर शाळेत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करतानाच घटनेच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळला. दरम्यान, पोलिसांनी मुख्याध्यापकासह एका शिक्षकास अटक करत त्यांच्याविरुद्ध
ग्रामस्थांचा ठिय्या : गाव बंद
या गंभीर घटनेची माहिती गावात समजताच संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शालेय आवारात धाव घेऊन आपला संताप व्यक्त केला. यावेळी काही तास ठिय्या आंदोलन केले. अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, घोटी पोलीस ठाणे आवारातही गावातील नागरिक, नातलग, पालक वर्गाने धाव घेतली. संपूर्ण गावाने घटनेचा निषेध नोंदवत कडकडीत बंद पाळला.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील एका खासगी शाळेत शुक्रवारी (दि.७) दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तेरा वर्षीय विद्यार्थिनी वर्गात उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम गोविंद साबळे (वय ५३) याने या विद्यार्थिनीस जवळ बोलावून ‘मी
सांगेल तेव्हा माझ्या घरी ये’ असे सांगत तिला घराचा पत्ता दिला. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळेतीलच शिक्षक गोरखनाथ मारुती जोशी (वय ४३) यांनी या विद्यार्थिनीला तुझी आजी साबळे सरांच्या घरी आली असल्याने तुला सरांनी त्यांच्या घरी बोलावल्याचे सांगत विद्यार्थिनीला साबळे यांच्या घरी पाठवले. विद्यार्थिनी मुख्याध्यापकाच्या घरी गेल्यानंतर साबळे याने बंगल्याचा दरवाजा बंद करत तिला प्यायला पाणी दिले. त्यात
विद्यार्थिनीला चक्कर आल्यासारखे झाल्यानंतर साबळे याने तिच्यावर अत्याचार केला.
पीडित विद्यार्थिनी शुद्धीवर येताच तिला आपल्यावर अत्याचार झाल्याची जाणीव झाली. यावेळी साबळे याने तिला झाला प्रकार कुणाला सांगितल्यास तुला व तुझ्या आजीला मारून टाकेल, अशी धमकी दिली.
सायंकाळी पिडित विद्यार्थिनी घरी गेल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. तिने घडलेला प्रकार आपल्या आजीसमोर कथन केल्यानंतर त्यांनी तत्काळ घोटी पोलिस ठाण्यात धाव पोलिसांनी पीडित घेतली. विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक तुकाराम साबळे व त्याला मदत करणारा शिक्षक गोरखनाथ जोशी यांना अटक करत पोस्कोन्वये गुन्हा दाखल केला.