ब्रेकिंग
म्हसरुळला बिल्डरच्या घरावर तरुणीचा गोळीबार, दगडफेक दोन दिवसांपूर्वी कारही फोडली होती; सीसीटीव्हीत घटना कैद.

• म्हसरुळला बिल्डरच्या घरावर तरुणीचा गोळीबार, दगडफेक
दोन दिवसांपूर्वी कारही फोडली होती; सीसीटीव्हीत घटना कैद
प्रतिनिधी
नाशिक जन्मत
नाशिक जन्मत नाशिक मध्ये एका महिलेने एका बिल्डरच्या घरावर गोळीबार केल्याची घटना काल घडून आली आहे.एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळी झाडत जीव मारण्याचा इशारा दिल्याचा प्रकर म्हसरुळमधील कलानगरमध्ये शुक्रवारी (दि. ७) पहाटे ४ वाजता घडला. चारच दिवसांपूर्वी या व्यावसायिकाच्या मुलाची कारही फोडण्यात आली होती. विशेष म्हणजे हल्लेखोरांमध्ये एका तरुणीचा समावेश असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
नाशिक मध्ये पहिल्यांदाच एका महिलेने गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. या घटनेने या परिसरामध्ये घबराट निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि श्री साई अंगद उमरवाल (रा. साई समर्थ रोहाउस नंबर ३, कलानगर, लेन नंबर ५) यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी पहाटे ४ वाजता कुटुंबियांसह घरात असताना एका युवतीसह तिघे दुचाकीवरून आले. त्यातील युवती व युवक घराजवळ येत तरुणीने बंदुकीतून घराच्या दिशेने गोळी फायर केली. गोळीबाराचा आवाज आल्याने घरातील सदस्यांनी बाहेर येऊन पाहिले. मात्र संशयित पळून गेले.
“