नोकरी

निफाड तालुक्यात उसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या*  *वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारत आवश्यक*

 

*निफाड तालुक्यात उसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या*

*वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारत आवश्यक*

 

*नाशिक, दिनांक 9 फेब्रुवारी, 2024 नाशिक जनमत वृत्तसेवा):*

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावार संत भगवानबाबा उसतोड कामगार मुला-मुलींची शासकीय योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी निफाड तालुक्यात मुलां-मुलींसाठी प्रत्येकी 100 क्षमतेचे एक अशी दोन वसतीगृह मंजूर झालेली आहेत. या दोन वसतिगृहासाठी सर्व सोई- सुविधांयुक्त इमारत भाडे तत्वावर घेणे प्रस्तावित आहे. तरी इच्छुक इमारत मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रसलपुर, निफाड चे अधीक्षक एन.व्हि. मेधणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

इमारत उपलब्ध असल्यास इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक कार्यालय येथे किंवा 02550241911व 8999391237 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही अधीक्षक श्री. मेधणे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे