महाराष्ट्र
डी.एल.एड् परीक्षा डिसेंबर 2023 चे निकाल
*डी.एल.एड् परीक्षा डिसेंबर 2023 चे निकाल जाहीर*
*नाशिक, दिनांक 9 फेब्रुवारी, 2024 (नाशिक जनमत वृत्तसेवा):*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड् डिसेंबर 2023 परीक्षेचे 13 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल 7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2.00 वाजता परिषदेचे संकेतस्थळ www.mscepune.in वर जाहीर करण्यात आलेला आहे. असे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
विद्यार्थ्यांना निकालाचे मुळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत हस्तपोच उपलब्ध होणार आहे. तसेच उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 फेब्रुवारी 2024 आहे. असेही, आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.