नासिक महानगरपालिकेत तीन अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली.
नासिक महानगरपालिकेत तीन अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली.
प्रतिनिधी |
नाशिक जन्मत
नवीन आलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी खांदेपालटाला सुरुवात केली आहे.. नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड तसेच भूसंपादनामुळे चर्चेत असलेले किरण लोणे यांची बदली करण्यात आली आहे. पगार व लोणे यांना पाणीपुरवठा विभागामध्ये पदस्थापना दिली आहे तर पलोड यांना वैद्यकीय विभागात पाठविण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी पगार यांच्या कार्यपद्धतीसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांची बदली करून
कार्यभार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
परदेशवारी करायचे असेल तर आयुक्तांची परवानगी बंधनकारक असून लोणे यांनी सर्व अधिकार डावलून केलेली परदेशवारी वादाचा विषय होता. शिस्तभंगासारखा प्रकार असल्यामुळे त्यांना निलंबित
करण्याची
मागणी लोकप्रतिनिधींकडून होत असताना त्यांची पाणीपुरवठा विभागात बदली
करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. भूसंपादनाची राज्य शासनामार्फत चौकशी सुरू झाली आहे.