आ.सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड येथे भव्य रोजगार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

आ.सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड येथे भव्य रोजगार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद
अरुण हिंगमिरे
पत्रकार नांदगाव
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्यातर्फे आज मनमाड येथील संपर्क कार्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता .
दुष्काळाची परिस्थिती पाहता आमदार सुहास आण्णा कांदे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले आणि मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध सुविधांचे लोकार्पण करण्याचे आयोजन केले, याचाच एक भाग म्हणून मतदारसंघातील तरुणांसाठी नौकरी ची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या मध्ये रिंग गेअर अक्वा, शारदा मोटर्स, बजाज सन्स, हिताची जळगाव, एम डी इंडस्ट्रीज, एल आय सी, महिंद्रा अँड महिंद्रा, टपारिया टूल, सतीष टोय, वैष्णवी ऑटो, किंप क्लॉथ, आर्ट रबर, व्ही आय पी, नाशिक, सिन्नर येथील 30 हून अधिक कंपनीचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यास मतदारसंघातील तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नौकरी करिता मुलाखत दिली, यावेळी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली.
1133 उमेदवारांनी नोकरीसाठी मुलाखत दिली तर यातील 776 मुलांना तात्काळ ऑफर लेटर ( joining letter) देण्यात आले.
संपूर्ण मतदारसंघातून या ठिकाणी तरुण तरुणी मुलाखतीसाठी आलेले होते.
या वेळी संपर्क कार्यालयं येथे थंड पाणी चहा ची व्यवस्था करण्यात आली होती.
युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान दादा खान, अल्ताफ बाबा खान, उप जिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, बबलू भाऊ पाटील, सौ.संगीता ताई बागुल, विद्या ताई जगताप, पुजाताई छाजेड यांच्या हस्ते प्रत्येकाला ऑफर लेटर देण्यात आले.
या मेळाव्याचे नियोजन रवी देवरे सरचिटणीस औद्योगिक कामगार सेना यांनी केले होते. या वेळी बोलतांना याबपुढेही आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नांदगाव, मनमाड, मालेगाव येथील संपर्क कार्यालयात नौकरी नोंदणी सुरू राहणार असून प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना नाशिक येथे बोलावले जाणार असून त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाते असे त्यांनी सांगितले.
या वेळी युवासेना शहराध्यक्ष योगेश इमले,आसिफ पहिलवान, गालिब शेख, अमीन पटेल, आझाद पठाण, आमीन शेख, राकेश ललवाणी, किशोर लहाने, अंकूश कातकडे, वाल्मीक आंधळे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, दिनेश घुगे, निलेश ताटे, अज्जू शेख, रमेश दरगुडे, विशाल सुरवसे, लोकेश साबळे, सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, अज्जू पठाण, स्वराज देशमुख, रिशिकांत आव्हाड, धनंजय आंधळे, स्वराज वाघ, अमोल दंडगव्हाळ, प्रमोद अहिरे, मन्नू शेख, प्रमोद राणा, कुणाल विसापूरकर सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, शहर संघटक नीतू परदेशी, सावित्री यादव उपस्थित होते.