दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान कार्यक्रमात* *सारथीच्या स्टॉलला उस्फूर्त प्रतिसाद*
L
*दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान कार्यक्रमात*
*सारथीच्या स्टॉलला उस्फूर्त प्रतिसाद*
*नाशिक, दिनांक 13 सप्टेंबर, 2023 नाशिक जनमत. वृत्तसेवा):*
जाहिरात. माऊली लांस ते डीजेपी नगर 2 अंबड रोड
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्ह्यात 5 सप्टेंबर 2023 रोजी मुख्य मार्गदर्शक दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान मंत्री दर्जा ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या ठिकाणी सारथी संस्थेच्या स्टॉलला विविध योजनांबाबत माहिती घेण्यासाठी दिव्यांग व्यक्ती, नागरिक व इतर नागरिकांनी भेट देवून उस्फूर्त प्रतिसाद दिला अशी माहिती उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी तथा उपजिल्हाधिकारी नाशिक सीमा अहिरे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमांतर्गत मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनीही सारथीच्या स्टॉलला भेट देली. यावेळी त्यांना सारथी संस्थेचे उपक्रम व योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी सारथी संस्थेमार्फत् योजनांचा लाभ मिळालेल्या दिव्यांग लाभार्थींना मुख्य मागदर्शक बच्चू कडू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित घटकांतील विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी सारथीच्या योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी तथा उपजिल्हाधिकारी नाशिक सीमा अहिरे यांनी केले आहे.