आरोग्य व शिक्षणनोकरी

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात कंत्राटी पदभरती*

*छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात कंत्राटी पदभरती*

*नाशिक, दिनांक: 1 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड येथे शारीरिक प्रशिक्षण निदेशक व मुलींच्या वसतीगृहासाठी निवासी काळजीवाहक (महिला कर्मचारी) ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिकांच्या वीरपत्नी व इतर नागरिक यांनी मुलाखतीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिकरोड येथे 7 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 10.15 पर्यंत हजर रहावे. असे आवाहन प्रभारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 9156073306 या भ्रमणध्वनी क्रमांकावर व 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही लेफ्टनंट कर्नल श्री.सोनवणे यांनी कळविले आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे