भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने आज महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ते पदीं प्रदिप पेशकर याची निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला तसेच महिला मोर्चाच्या सुवर्णाताई दोंदे यांची मीडिया सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच आमचे मित्र दैनिक नवराष्ट्र पत्रकारगिरासे सर यांना समाज भुषण पुरस्कार देण्यात आला यावेळी प्रदिप पेशकर यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब घुगे हे जरी दिव्यांग असले तरी त्यांचे कार्य चांगल्या माणसाला लाजवेल असे आहे असे म्हटले शिवाजी नाना बरके यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब प्रत्येक कार्यक्रम घेत असतात असे म्हटलेन्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे मंडळाचे अध्यक्ष शिवाजी नाना बरके महिला मोर्चा अध्यक्ष अर्चनाताई दिंडोरकर दिलीप देवांग पिंटू भाऊ काळे जयश्री धारणकर गणेश पाटे सागर जैन मनसे नेते सागर कडभाने साहेबराव कांगणे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे यांनी केले होते सूत्रसंचालन सुनील सोनवणे यांनी केलेआभार रोहीदास आव्हाड यांनी मानले