
गंगाधरी गावचे राष्ट्रवादीचे सरपंच उप सरपंचांचा राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
- नांदगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून नांदगाव शहरालगत असलेल्या गंगाधरी येथील ग्रामपंचायतचे राष्ट्रवादीचे सरपंच सुनील गणेश खैरनार उप सरपंच वर्षा गणेश ईघे , गणेश शिवाजी ईघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत आज आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या निवास स्थानी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी आमदार कांदे शिवबंधन बांधत त्यांचे पक्षात स्वागत केले. आपल्याला येथे मान सन्मान मिळेल, आपल्या सूचना ऐकून घेतल्या जातील तसेच गंगाधरी गावच्या विकासाकरिता सदैव आपल्या सोबत राहू अशी ग्वाही या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दिली.
या वेळी जिल्हा प्रमुख किरण देवरे, गंगाधरीचे शिवसेना शाखा प्रमुख दिगंबर भागवत, रमेश गांगुर्डे, राजाभाऊ देशमुख, संजय आहेर, रामहरी ईघे, भगीरथ जेजुरकर, सोपान जाधव, नाना ईघें, साहेबराव मोकळं, संदीप खैरनार, अनिल बागुल, भरत ईघें उपस्थित होते. नुकताच करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्या दिवशी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन शहर प्रमुख बाळा काका कलंत्री यांच्यासह अनेकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विकास कामाचा धडाका बघून मागील काही दिवसात अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख किरण देवरे यांनी सांगितले की आमदार सुहास अण्णा कांदे हे तालुक्याचे विकास पुरुष असून त्यांच्याकडे कथनी एक आणि करणे एक असा प्रकार नसल्याकारणाने अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे यापुढे देखील तालुक्यातील अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असून पुढील काही दिवसात तालुक्यात फक्त आणि फक्त शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष असल्याचे दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.