नासिक रोड भागात खून आरोपीस अटक. मित्रानी केला मित्राचा खून संशयित अटकेत .
नाशिक शहरामध्ये खुणाच्या घटना वाढत आहेत

प्रतिनिधी | नासिक प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. काल एकीकडे शिवजयंती साजरी होत असताना मित्रांनी मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडीस आला आहे . संशय ितत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. याबाबत अधिक माहिती अशी की
नाशिकरोड येथील नवले कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आणि शासकीय मुद्रणालयाच्या मैदानावर गुरुवारी (दि. २०) दुपारी १ च्या सुमारास २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याचे आणि हात व तोंडावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत होते जुन्या वादातून मित्रांनी हा खून केल्याचे सांगण्यात येत आहे.
एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे तीन जण फरार आहेत.
अजय भंडारी याच्या हत्येतील संशयिताला नाशिकरोड पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली आहे. तसेच यामधील प्रमुख संशयित तुषार संजय खरे (१८) याला ताब्यात घेतले असून तीन संशयित फरार आहेत. मृत अजय आणि संशयित तुषार हे दोघे बुधवारी
सहभागी होत या ठिकाणी नाचून रात्री उशिरा अजय शंकर भंडारी (२४, रा. विष्णूनगर, स्टेशनवाडी) हा आणि त्याचा मित्र दुचाकीवरून घरी निघाले होते. त्याच दरम्यान दोघेही दुचाकीवरून पडले.
गुरुवारी दुपारी बारा वाजता प्रेस २ मैदानावर एका तरुणाचा मृतदेह आढळला.
दुपारपासून मद्यपान करून मित्र सोबत फिरत होते. दोघांमध्ये जुना वाद असल्याने त्याचा बदला घेण्यासाठी तुषार आणि त्याच्या मित्रांनी अजयला नवले कॉलनीच्या रस्त्याकडे नेत दगड घालून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
दुचाकीही (एमएच १५ जीवाय ८०५७) घटनास्थळी आढळून आली. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. रात्री दीडला तो आईशी बोलला असल्याचेही मित्रांनी यावेळी सांगितले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा नासिक मध्ये गुन्हेगारी कमी होत नसल्याचे दिसत आहे. पोलीस यंत्रणेने ग्रस्त घ**** महत्त्वाचे झाले आहे तरुण पिढीने रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे झाले आहे. राग क्रोध मुळे युवक आपले जीवन उध्वस्त करत आहे. युवकांसाठी परिवर्तन होण्यासाठी चांगल्या विचाराची जनजागृती होणे महत्त्वाचे झाले आहे..