आईने घोटला चिमुकल्यांचा गळा; व पतीवरही केले वार
आईने घोटला चिमुकल्यांचा गळा; व पतीवरही केले वार
दौंड : घरगुती वादातून आईने दोन
चिमुकल्यांना गळा दाबून ठार मारले, तसेच झोपेत असलेल्या पतीवर – कोयत्याने वार करत स्वतः पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे शनिवारी पहाटे घडली असून, पतीला बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शंभू उर्फ हर्ष दुर्योधन मिंढे (३), पियू (१) अशी मृतांची नावे आहेत. पती दुर्योधन आबा मिंढे (३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. पत्नी कोमल (३०) हिला
दुर्योधन मिंढे हे आयटी कंपनीमध्य स्वॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. मात्र, दोन वर्षांपासून घरूनच वर्क फ्रॉम होम करत होते, तर कोमल ही देखील बीएस्सी केमिस्ट्री झालेली आहे. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. शुक्रवारी रात्रीही वाद झाला. त्यानंतर बेडरूममध्ये कोमल आणि तिची चिमुकली मुलगी पीयू झोपलेली होती. सर्वप्रथम तिने मुलीचा गळा आवळून खून केला. आजीजवळ झोपलेल्या शंभूला बेडरूममध्ये आणले आणि त्याचाही गळा आवळून खून केला. त्यानंतर, बाहेरच्या खोलीत झोपलेले पती वर केला. यात तो जखमी झाला. अधिक तपास पोलीस करत आहे.