भर दिवसा अंबडच्या महालक्ष्मी नगर मध्ये दरोडा 25 लाखाचे सोने चोरीला..

नाशिक जन्मत अंबडच्या महालक्ष्मीनगर परिसरात सराफी व्यावसायिक दाम्पत्याच्या छातीवर बंदूक ताणत तीन चोरट्यांनी सुमारे २४ लाखांचे ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने अवघ्या काही मिनिटांत लुटल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या झालेल्या या लुटीने परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरन निर्माण झाले आहे.
अंबरच्या महालक्ष्मी नगर मधील भर रस्त्यावरील मीरा मेडिकलच्या मागे असलेले श्री ज्वेलर्स या दुकानात ही चोरी झाली आहे. दुकानात जवळील बराचसा रहा वासी एरिया आहे. मोठे वर्दळ या रस्त्यावर राहते.
अंबडच्या महालक्ष्मीनगरमध्ये दीपक घोडके यांचे मागील २० वर्षांपासून श्री ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे. दोन चोरटे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास दुकानात शिरले. त्यापैकी एकाने दीपक घोडके यांच्या छातीवर बंदूक ताणली, तर
त्यांची पत्नी मनीषा घोडके यांना एकाच जागेवर बसा, अन्यथा याद राखा, अशी धमकी दिली. दरम्यान अन्य चोरट्याने सराफी दुकानातील सोन्याच्या अंगठ्या, नेकलेस, झुमके, ब्रेसलेट, नथीसह सोन्याचे दागिने लुटले. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये केदाझालेले आहे. दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही बंद होता.
।
दुकानाबाहेर पडताना चोरट्यांनी घोडके दाम्पत्यावर गुंगीचा स्प्रे मारला आणि पसार झाले. यानंतर या दाम्पत्याने आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अंबड पोलीस करत आहे. दरोडेखोरांनी गुन्हा करण्याच्या अगोदर रेकी केल्याचे समोर येत आहे. भर दिवसा झालेल्या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पुरुष निरीक्षक पवार यांची बदली करण्यात आलेली असून ट्राफिक पोलीस आयुक्तालयातील हाडे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.