महिलेला धिंड काढण्याची धमकी, कोर्टाच्या आदेशाने गुन्हा. शिलापूर येथील घटना .
महिलेला धिंड काढण्याची धमकी, कोर्टाच्या आदेशाने गुन्हा
प्रतिनिधी | नाशिक जनमत शेतीच्या वादातून अंगावर ट्रॅक्टरघालने. व धमकी दिल्या प्रकरणी मे 2023 मध्ये घडलेल्या घटनेत कोर्टाने गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे ही घटना 2023 मध्ये घडली होती
*शेतीच्या वादातून महिलेची नग्न धिंड काढण्याची धमकी देत अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मे २०२३
मध्ये शिलापूर शिवारात हा प्रकार घडला होता.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शिलापूर येथे शेतजमीन आहे. संशयित वसंत कहांडळ, प्रकाश कहांडळ, भानुदास कहांडळ, भास्कर कहांडळ, विश्राम कहांडळ यांनी संगनमत करत शेती करण्यास मज्जाव करत शिवीगाळ केली.
पोलिसांत तक्रार दिली होती मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
महिलेने न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाने संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आडगाव पोलिसांना दिले. या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार तपास करत आहे.
र