राजकिय

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत.


  1. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत

अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे वारसांना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून व पाठ पुराव्या नंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत आज शुक्रवार दिनांक १५ एप्रिल रोजी आमदारांच्या निवास्थानी कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चेक स्वरूपात दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचे वारसांना स्व. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आर्थिक मदत देण्यात येत होती. या योजनेत महाविकास आघाडी सरकारने सुधारणा करून शेतकरी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास देखील त्याचे वारसांना आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ६ एप्रिल २०२१ रोजी लागू करण्यात आला होता. परंतु त्या आधी म्हणजे १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबिय या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले होते. त्यात नांदगाव मतदार संघातील १० शेतकरी कुटुंबीय देखील होते. त्यामुळे नांदगांव मतदार संघातील त्या १० शेतकरी कुटुंबियांचा प्रस्ताव स्विकारण्यात येवून त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी केली होती. आमदारांचे प्रयत्नांना यश आले असुन शासन निर्णयाप्रमाणे १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या कालावधी दरम्यान अपघाती मृत्यू झालेले रवींद्र अशोक गोडसे अनकवाडे, गणपत म्हसू घुगे नागापूर, अर्चना अशोक पवार नागापूर, पंढरीनाथ तुकाराम वाघिरे डॉक्टरवाडी, गणेश देवचंद बिडगर भार्डी, सोपान दादा चव्हाण ढेकू खू, तुकाराम बाळनाथ जाधव वंजारवाडी इत्यादी मृत्य पावलेल्या शेतकऱ्यांचे वारस अशोक वामन गोडसे अनकवाडे, बबाबाई गणपत घुगे नागपुर, शोभा अशोक पवार नागापूर, निर्मला पंडित वाघेरे डॉक्टरवाडी, कविता गणेश बिडगर भार्डी, रेखा सोपान चव्हाण ढेकू खू:, छाया तुकाराम जाधव वंजारवाडी यांना आज आमदार सुहास आण्णा कांदे व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत दोन लाख रुपयांचा चेक वारसदारांना सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थित महिलांना साडीचोळी देऊन आदर सत्कार केला.

आमदार म्हणून आपला भाऊ म्हणून यापुढे काहीही मदत लागल्यास मला येऊन भेटा तुमची सर्व मदत मी करेल असे आश्वासन दिले. आपल्यावर वाईट प्रसंग आलेला असला तरी आता हरायचे नाही आता लढायचे असे सांगून त्यांना धीर दिला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, शहर प्रमुख सुनील जाधव, युवासेना प्रमुख सागर हिरे, माजी उपसभापती राजाभाऊ देशमुख, भाऊसाहेब सूर्यवंशी, प्रहार शेतकरी संघटनेचे संदीप सूर्यवंशी, प्रशांत पगार, आण्णा मुंडे, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी जे.आर.पाटील, कृषी सहाय्यक विजय खैरनार, आर. बी. कदम, क्लार्क श्री. जांभळे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे