एमडी ड्रग बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक अंबड च्या शोध पथकाचा तपास.

सिडको नाशिक जन्मत एमडी ड्रग सारखे अमली पदार्थ नाशिक शहरामध्ये सरसपणे काही भागांमध्ये विकल्या जात असल्याचे सर्वत्र चित्र आहे. काल एमडी ड्रग बाळगल्या प्रकरणी अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहा ग्रॅम एमडी ड्रग व विनापरवाना अग्निशास्त्र असा एकूण ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरव पाटील (२५, रा सप्तशृंगी चौक श्रीराम नगर सिडको) योगेश मोघे (३०, पाथर्डी गाव), विजय कुमावत (रा. कडवे नगर) यांना पोलिसांनी ताब्यात आहे. त्यांच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या विक्री करणाऱ्या या संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली.
गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सागर जाधव नवनाथ काकड यांना गोपनीय माहिती मिळाली ही संशयित गौरव उमेश पाटील हा आपल्या साथीदार विजय कुमावत व योगेश मोघे यांच्यासह पाथर्डी फाटा उड्डाणपूल खाली अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दहा ग्रॅम एमडी ड्रग्स व विनापरवाना अग्निशास्त्र व दोन जीवंत काडतूस असा एकूण 96 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कार्यवाही अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी झनकसिंग घुणावत, नवनाथ काकड, राहुल जगझाप, सागर जाधव, समाधान शिंदे, यांच्या पथकाने केली याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत. तरुण पिढी अमली पदार्थांच्या स्वाधीन होत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरामध्ये कॉलेज रोड गंगापूर रोड इत्यादी भागांमध्ये हुक्का पार्लर देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पुन्हा काही दिवसानंतर हुक्का पार्लर चालू झाल्याचे बोलल्या जात आहे.