; बंद घरातील ३.८० लाख लांबविले
नाशिक जन्मत | नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी बरोबरच चोरीचे प्रमाण देखील वाढलेले आहे. महिलांचे मंगळसूत्र चोरणे दुचाकी वाहने चार चाकी वाहने चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पोलिसांची गस्त कमी पडत आहे. दरम्यान हे सर्व प्रकार कमी होत नाही आहेत. दोन दिवसांत भरदिवसा बंद घरांना
लक्ष्य करत घरफोडी करण्यात आली. कुटे मार्गावरील एका इमारतीमध्ये फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून तीन लाख ८० हजारांचे दागिने चोरी करण्यात आले. दोन दिवसांत दोन मोठ्या घरफोड्या झाल्याने पोलिसांच्या गस्तीवर

प्रश्न उपस्थित होत आहे. कुटे मार्गावरील प्रिन्स टॉवरमधील मुथा यांच्या घरी झालेल्या घरफोडीबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुथा सकाळी १२ ते रात्री ९ या कालावधीत कामानिमित्त बाहेर असताना फ्लॅटच्या दरवाजाचे लॉक तोडून घरामध्ये प्रवेश करत ३ लाख ८० हजारांची रोकड चोरी करण्यात आली. इमारतीमध्ये सुरक्षारक्षक असताना घरफोडीचे गुन्हे घडत आहे. दोन दिवसांपूर्वी तिडके कॉलनी येथील एका व्यावसायिकाच्या घरातून ७ लाखांचे दागिने चोरी करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना दुसरी घरफोडी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी दिवस-रात्र गस्त वाढवणे गरजेचे आहे. पुढे उन्हाळा सुट्टी लागत असल्याने घर बंद करताना सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सोसायटीमध्ये वाचमेन ठेवणे जरुरी झाले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा